आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनविभागाची कारवाई:सोलापूरमध्ये तितर पक्षाची शिकार करणाऱ्याला घेतले ताब्यात; गुन्हा दाखल

सोलापूर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरघोट दक्षिण सोलापूर येथे तितर पक्षाची शिकार केल्याप्रकरणी नागनाथ अण्णप्पा खुटेकर (वय 55) याला वनविभागाने ताब्यात घेतले. कारहुनवी सणाचा दुसरा दिवस ‘कर दिवस’ म्हणून साजरा करण्याची अघोरी प्रथा आहे. या कर दिवसानिमित्त पक्षाची शिकार करताना बुधवारी (दि.15) नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या पथकाने शिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

सोलापूर शहर, परिसरातील दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मंगळवारी (दि.14) कारहुनवी (कर्नाटक बेंदूर) साजरी झाली. त्या सणाचा दुसरा दिवस कर दिन म्हणून साजरा होते. वन्यप्राण्यांची शिकार करुन त्याचे तुकडे करुन गोठ्यामध्ये पुरणे, आळबळकव्वा देवाला त्याचा नैवैद्य दाखवण्यात येत.

गुन्हा दाखल

गेल्या काही वर्षांपासून वनविभागाने शिकारीच्या विरोधात जनजागृती, शिकाऱ्यांवर कडक कारवाईची भूमिका घेतली आहे. बुधवारी कुरघोट येथे तितर पक्षाची शिकार करताना खुटेकर यास ताब्यात घेतले. त्या विरोधात वन्यजीव कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलचे साहिल सनधी यांनी सायंकाळी शिकाऱ्याला पकडले. तसेच, मानद वन्यजीव रक्षक भरत छेडा, पप्पू जमादार, तरुण जोशी यांच्यासह नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी सीमावर्ती भागामध्ये गस्त घातली. वनपरीक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे, वनपाल एस. ई. सावंत, वनरक्षक तुकाराम बादणे हे शिकार प्रकरणी पुढील कारवाई करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...