आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार दिलीप मानेंनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट:अतिवृष्टी, पीक नुकसान जनावरांचे विषाणूजन्य आजारांसदर्भात मांडले प्रश्न

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी आमदार दिलीप माने यांनी शेकडो शेतकऱ्यांच्यासह सोमवारी जिल्हा नियोजन भवन या ठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सर्व मंडल निहाय पंचानामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

यामुळे आणखी मोठ्या स्वरूपाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरीप हंगामातील बहुतांश पिके, भाजीपाला अतिवृष्टीमुळे सडून गेला आहे, त्याही शेतकऱ्यांना मदत मिळावी. जनावरांना लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव वाढतोय. दुग्ध उत्पादनावरच ज्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे, अशा कुटुंबियांची मोठी गैरसोय होण्याचा धोका आहे.

लसीकरणाचे आवाहन

दूध कमी होणे, प्रसंगी जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता या संसर्गजन्य विषाणूमुळे वाढते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुधनाला तातडीने लसीकरण करून घ्यावे, अशी ही मागणी यावेळी करण्यात आली. सोलापूर होटगी रस्त्याची दूरअवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी ही मागणी माजी आमदार माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, अशी माहिती माने यांनी दिली.

यांची उपस्थिती

यावेळी माजी उपसभापती संभाजी भडकंबे, आप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, चंद्रकांत कुलकर्णी, चंद्रकांत खुपसंगे, विकास पाटील, सचिन गुंड, वैजनाथ गवळी, भारत भोसले, शिवाजी पाटील, भास्कर सुरवसे नेताजी सुरवसे, चंद्रकांत शिंदे, ज्ञानोबा साखरे, मधुकर माने, शिवा व्हाेसाळे, प्रमोद शिंदे,अजय सोनटक्के, राजकुमार शिंदे, सुनील जाधव, इंद्रजित लांडगे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...