आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:सासऱ्याला मारहाण करणाऱ्या सूनेसह चौघांवर गुन्हा दाखल

मंगळवेढा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक वादातून माहेरी आलेल्या सुनेला घेऊन जाण्यासाठी आलेल्या सासू-सासऱ्याला मारून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सून रुक्मिणी सिध्देश्वर जाधव, सुनेचा भाऊ संकेत नवनाथ सुडके, आई-वडील पार्वती नवनाथ सुडके व नवनाथ संभाजी सुडके (सर्व रा. महंमदाबाद शेटफळ ता. मंगळवेढा) या चौघांवर मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्याद जखमी सासरे पोपट बाबूराव जाधव (वय ६१ व्यवसाय रा. स्वामी विवेकानंद वाखरी ता. पंढरपूर) यांनी दिली आहे. ही घटना ६ मार्च रोजी रविवारी दुपारी दीड वाजता घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी : फिर्यादी पोपट जाधव यांच्या सुनेचे माहेर महमदाबाद (ता. मंगळवेढा) येथील आहे. त्यांच्या मुलाचे लग्न ४ जून २०१४ रोजी झाले. सून रुक्मिणी हिला एक भाऊ संकेत नवनाथ सुडके, वडील नवनाथ संभाजी सुडके, आई पार्वती नवनाथ सुडके असे असून, ते महमदाबाद येथे वस्तीवर राहतात. चार महिन्यापूर्वी फिर्यादीचा मुलगा सिध्देश्वर व सून रूक्मिणी यांच्यात घरगुती वादामुळे सून रुक्मिणी हिला तिचे वडील नवनाथ सुडके यांनी त्यांचे घरी घेऊन गेले होते. त्यानंतर फिर्यादीने नवनाथ सुडके यांना वारंवार फोन व नातेवाइकांच्या मध्यस्तीने रुक्मिणीला आणून सोडा. नवरा-बायकोचे भांडण मिटवू असे सांगत होते. परंतु रुक्मिणीला सोडले नाही. सुडके यांनी फिर्यादीच्या नातेवाइकामार्फत बैठक घेण्याचे ठरवल्याने सर्व नातेवाईक एकत्र आले होते. वडील नवनाथ संभाजी सुडके यांनी फिर्यादीला पाहुण्यासमोर आम्ही मुलीस सोडणार नाही, म्हणून शिवीगाळ, दमदाटी करू लागल्याने फिर्यादी व पत्नी शशिकला दोघे बैठकीतून उठून निघाले. सुडके यांच्या डाळिंबाच्या पिकातून जाताना काठीने फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले. पत्नीला पाठीवर, डोक्यावर मारून जखमी केले. सून रुक्मिणी सिध्देश्वर जाधव हिने तिचे डाळिंबाच्या काठीने सासूला मारून जखमी केले. सुनेची आई पार्वती सुडके हिनेदेखील मारहाण केल्याची तक्रार मंगळवेढा पोलिसात दाखल झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...