आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतीच्या निवडणुका:निवडणूक कामासाठी चार शाळा मंगळवारपासून बंद

वैराग7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्शी तालुक्यातील चार शाळा निवडणुकीच्या कामासाठी मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. पानगाव आणि वांगरवाडी या दोन गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. आंबेगाव, हळुदगे, निंबळक व भांडेगाव येथील शिक्षकांना निवडणुकीचे काम लागल्यामुळे या शाळा मंगळवारपासून बंद आहेत. ज्या गावांमध्ये शाळा बंद असल्याचे दिसून आले आहे, त्या गावातील शाळा सुटीच्या दिवशी भरवून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करण्यात येईल, असे गटशिक्षणाधिकारी एल. एस. जाधव यांनी सांगितले.

पर्यायी व्यवस्था करण्याचे अधिकार शिक्षण विभागाला आहेत. आम्ही फक्त शिक्षकांची यादी मागून घेतो. ते शिक्षक कुठल्या शाळेवर आहेत याची माहिती आम्हाला नसते, असे नायब तहसीलदार संजीवन मुंडे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...