आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी वैद्यकीय पदवी घेताना माझ्याकडे १४ गोल्ड मेडल होती. एमएस ( सर्जरी) वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर जेजे वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे एमसीएच ( मास्टर ऑफ चिररगी) या पदवी परीक्षेत नापास झालो. आई-वडील, माझे बंधू डॉ. तात्याराव यांना अनेकजणांनी नापास झाल्याचे सांगितले. यावेळी विचार केला, मला ही संधी आहे. पुढच्या वर्षी मात्र आज बोलणाऱ्या माणसांची तोंडं बंद करू शकतो, अस मी घरी सांगितलं आणि पुढच्याच वर्षी पुन्हा एमसीएच परीक्षा टॉपमध्ये पास झालो.
आज २२ वर्षे लातूरमध्ये रुग्णांना सेवा देतोय. भारतात नव्हे जगातल्या अनेक नामवंत व्यक्तींशी बोललो आहे, भेटलो आहे. संवाद साधला आहे. नापास होणं म्हणजे संपल असं काही समजू नका, जी व्यक्ती नापास झाली आहे, तीच आज जगात मोठ्या पदावर यशस्वी म्हणून काम करत आहेत. ही यशस्वी कहाणी लातूर येथील डॉ. विठ्ठल लहाने यांची.
आज त्यांच्याशी संवाद साधला. १० वीत असताना आमच्या घरी वीज नव्हती. शाळेला चालत जायचं. दहावीची परीक्षा सेंटरही दुसऱ्या गावात होती. अशा स्थितीत शिक्षण घेतले. अकरावी-बारावीनंतर आंबेजोगाईला एमबीबीएस पदवी शासकीय महाविद्यालयात घेत होतो. त्यावेळी माझ्याकडे १४ गोल्ड मेडल होते. एमएस ( सर्जरी) पदवीनंतर मी एमसीएच पदवी घेण्यासाठी जेजे महाविद्यालय, मुंबई येथे गेलो. राज्यात नागपूर आणि मुंबईमध्येच ही पदवी घेण्याची सोय आहे. १९९९ सली यात अपयश आले, २००० ला पुन्हा पास झालो. काही काळ मनात असा विचार आला की १४ गोल्ड मेडल घेतल़ेला माणूस नापास होतो. त्यावेळी ठरवलं ही नवीन शिकण्याची संधी आहे, आपण बोलणाऱ्यांची तोंडं बंद करूयात.
लातूरमध्ये हॉस्पिटल आहे. २२ वर्षापासून सेवा देत आहे. पावणे पाचला मी पहिला रुग्ण पाहतो. त्यानंतर सायंकाळी साडेसहापर्यंत काम चालते. साडेसातनंतर आईवडील, मुले, पत्नी यांच्याशी संवाद साधतो.
जे नापास होतात तेच यशस्वी
आयुष्यात जे नापास होतात तेच यशस्वी होतात असं माझं प्रामाणिक मत आहे. आज जगात जे उच्च पदावर काम करणारी माणसं आहेत, यशस्वी व्यक्ती आहेत, ते कधी ना कधी त्यांच्या आयुष्यात परीक्षेत नापास, एका प्रसंगात अपयशी झाले आहेत. त्यांना आता कोणीही विचारत नाही की, तू दहावी-बारावीत नापास झाला होता का. त्याच काम म्हणजे यशस्वी जीवन आहे. ते जगाला प्रेरणादायी आहे. त्यामुळे शिकत राहा, पुढे जात राहा. नापास म्हणजे आयुष्यातला टर्निंग पॉइंट समजा, असे डॉ. लहाने सांगतात. मी अनेक शहरात, राज्यात मुलांना प्रेरणादायी विचार देण्यासाठी जातो. मुलांशी संवाद साधतो. शाळा, महाविद्यालयांत गेल्यानंतर मुलांना याच विषयावर सांगतो. नापास झाल्यावर खचून न जाता ती संधी आहे असे समजा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.