आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:पुणे महामार्गावर कोंडीजवळ अपघातामध्ये कोल्ह्याचा मृत्यू; मृतदेहाचे शासकीय पशुचिकित्सलयात शवविच्छेदन

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी (उत्तर सोलापूर) परिसरात वाहनांच्या धडकेने एका कोल्ह्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पूर्ण वाढ झालेल्या मादी कोल्ह्याचा मृत्यू झाला. महेश मोरे यांनी वन्यजीव प्रेमी सुरेश क्षीरसागर यांनी घटनेची माहिती दिली. मृतदेहाचे शासकीय पशुचिकित्सलयात शवविच्छेदन केले. महामार्गावर वन्यप्राण्यांना येजा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली.

बातम्या आणखी आहेत...