आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल पोलिसांचा इशारा:व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याच्या बहाण्याने फसवणूक होऊ शकते

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन फसवणूक होऊ शकते. यामुळे सावधान, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलिसांनी असा पहिला गुन्हा नोंदवून घेतला आहे आणि त्यामध्ये चार आरोपींना अटक केली असून एकूण २५ लाखाहून अधिक किमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये असा प्रकार नसला तरी शहर सायबर सेल पोलिसांनी नागरिकांनी सावध राहावे यासाठी निवेदन प्रसिद्ध केले.

काही हॅकर्स आपले नंबर शोधून एसएमएसद्वारे अथवा सोशल मीडियावर आपल्याला संदेश पाठवतात, लिंक पाठवतात आणि व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याच्या बहाण्याने आपल्याशी संपर्क करून आपल्याकडून ऑनलाइन पैसे भरून घेतात. शक्यतो कुठलीही दूरसंचार सेवा अशी ऑनलाइन व्हीआयपी नंबर देण्यासाठी पैसे भरून घेत नाहीत. जर‌ कोणी आपल्याला पैसे भरण्यास सांगत असेल तर आपली फसवणूक होत आहे हे लक्षात घ्यावे. याबाबत कोणाला काही शंका, माहिती अडचणी असल्यास त्यांनी सायबर सेल पोलिसात संपर्क करावा अथवा पैसे ट्रान्सफर करण्याअगोदर विचार करावा. फसवणूक झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा सावध राहा हाच त्यावर उपाय आहे.

या मोहाला बळी पडू नका, काळजीपूर्वक व परिपूर्ण माहिती घेऊनच व्यवहार करावा अथवा तात्काळ सायबर सेलला संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सय्यद शौकत अली यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...