आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:खोटा दाखला तयार करून पतसंस्थेची फसवणूक

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पतसंस्थेचे कर्जापोटी जमीन गहाण असलेली सात बारा उताऱ्यावरील नोंद बनावट कागदपत्रांच्या आधारे कमी करून पतसंस्थेची २० लाख ३४ हजार ३६० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कर्जदारासह गुरसाळेचे तलाठी आणि मंडलाधिकारी यांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कर्जदार शालिवाहन भागवत कोळेकर, सहकर्जदार विजया शालिवाहन कोळेकर, विष्णू सदाशिव फडतरे, मंडलाधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर, रतिलाल वाघमारे, सीताराम निंबाळकर ही सशयित आरोपींची नावे आहेत.

तुंगत ता. पंढरपूर येथील कर्मयोयी सु. रा. परिचारक पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दिगंबर नरहरी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. पतसंस्थेच्या पंढरपूर शाखेतुन २ डिसेंबर २०१० रोजी शालिवाहन भागवत कोळेकर यांनी ६ लाख ५० हजार रुपये जमीन तारण कर्ज घेतले होते. या कर्जासाठी शालिवाहन कोळेकर यांनी स्वताची गुरसाळे ता. पंढरपूर येथील १४ एकर २५ गुंठे जमीन गहाण ठेवली.

विजया शालिवाहन कोळेकर यांना सहकर्जदार होत्या. मुदतीत कर्ज फेड झाली नाही. ३१ मार्च २०१८ अखेर या कर्जाची एकूण रक्कम २० लाख ३४ हजार ३६० रुपये झाली. २०१३ला जिल्हा सहकारी न्यायालयात संस्थेने कर्ज वसुलीचा दावा दाखल केल्यावर या संदर्भात सदर जमिन विक्री अथवा हस्तांतरणास कोर्टाने मनाई केली होती.

अशी झाली पतसंस्थेची फसवणूक
कर्जदार शालिवाहन भागवत कोळेकर यांच्यासह यांनी संस्थेचे कर्ज नसल्याचा बनावट बेबाकी दाखला खोटे प्रमाण पत्र खोटे शिक्के वापरून तयार केले होते. गाव कामगार तलाठी विष्णू सदाशिव फडतरे, मंडलाधिकारी बाळू चंद्रकांत औसेकर, गावातील रतिलाल वाघमारे आणि सीताराम निंबाळकर यांच्या मदतीने बोजा निम्मी करून तसा पंचनामा तयार केला होता. यासंदर्भात संस्थेला माहिती होताच कर्मयोयी सु. रा. परिचारक पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दिगंबर नरहरी शिंदे यांनी पंढरपूर तालुका पोलीसात फिर्याद दिली.

बातम्या आणखी आहेत...