आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:कलाकार असल्याचे भासवून केली लावण्यखणी निर्मात्याची फसवणूक

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लावण्यखणी कार्यक्रमाचे निर्माता व वितरक असणारे विजयकुमार पांडुरंग साळुंखे (वय ६४, रा. भवानी पेठ) यांना लावण्यखणी कार्यक्रमाचे तीन लाख रुपये अॅडव्हान्सपोटी पाठवल्याचे खोटेच भासवून एका कलाकाराच्या मानधनापैकी ४५ हजार रुपये ऑनलाइन घेतले व फसवणूक केली, अशी फिर्याद विजयकुमार साळुंखे यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.

ही घटना ९ ऑक्टोबर रोजी घडली. तक्रारीवरून हनिफ शेख, अनिकेत व इलियास अन्सारी, सुनील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. फिर्यादी विजयकुमार साळुंखे हे आपल्या घरी असताना त्यांना इलियास अन्सारीचा फोन आला. पिरवाडी, जि. निपाणी येथून बोलत आहे, हनिफ शेख यांचा दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरून फोन आला.

अनिकेत नावाचा पाहुणा कलाकार कार्यक्रमात घ्या, त्याला ४५ हजार मानधनापोटी द्या असे सांगितले. यानंतर अनिकेतचा पैशासाठी फोन आला. व फोन पे वरून पैसे मागितले. त्याला १० ऑक्टोबर रोजी प्रथम ३५ हजार व नंतर १० हजार असे एकूण ४५ हजार रुपये पाठविले. मात्र दरम्यान तीन लाख रुपये जमा होण्याबाबत शंका वाटल्याने खात्री केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून श्री. साळुंखे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...