आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला जेरबंद:ज्येष्ठांची फसवणूक; शासकीय अनुदान मिळवून देण्याचे दिले होते आश्वासन

सोलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ महिलांना शासकीय अनुदान मिळवून देते अशी पथ मारून दागिने घेऊन फसवणूक करणाऱ्या एका संशयित महिलेला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मी मोहन आसादे (वय ४३, रा. महावीर तालीम बोळात, मुरलीवाला लष्कर) यांना अटक आहे.

पोलिस उपायुक्त बापू बांगर, सहायक निरीक्षक श्रीनाथ महाडिक व पथकाने कारवाई करत महिलेला कर्णिकनगरजवळ अटक केली. तिच्याकडून एक तोळे दागिने जप्त केले आहे. एमआयडीसी, जेल रोड परिसरात तीन गुन्हे केल्याची कबुली तिने दिली आहे. २००६ मध्ये पुण्यात तर मार्च २०२२ मध्ये बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. अनेक वर्षापासून महिलेचा शोध सुरू होता. बार्शी, पुणे, परिसरातही त्यांनी अशा पद्धतीने घटना केले आहेत.

तपासासाठी त्या पोलिसांनी ताबा मागितला आहे, असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील दोरे यांनी सांगितले. अशी करायची फसवणूक : वयस्कर महिला रस्त्यावरून जाताना, दिसली की, ती मुद्दाम फोनवरून शासकीय अनुदानाबाबत बोलायची लगेच शेजारील महिला म्हणायची मलाही मदत मिळेल का ? अशी विचारणा झाली की, संबंधित महिला रिक्षातून नेऊन शासकीय कार्यालयासमोर यायची. दागिने काढून ठेवा. तुमची‌ कागदपत्रांची झेरॉक्स काढून आणते म्हणून ती जायची परत यायची नाही.

बातम्या आणखी आहेत...