आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Free Checkup Of 1874 Women In Health Camp On Navratri; 392 Women Carried Out Sonography Under The Municipal Corporation's Initiative| Marathi News

आरोग्य जागर:नवरात्रनिमित्त आरोग्य शिबिरात 1874 महिलांची मोफत तपासणी; महापालिकेचा उपक्रम ३९२ महिलांची केली सोनोग्राफी

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्री उत्सवानिमित्त महिलांचे आरोग्य तपासणीसाठी विशेष ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानास सुरुवात झाली आहे. त्यामध्ये शहरातील विविध आरोग्य केंद्रातून १८७४ महिला व गरोदर मातांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ३९२ महिलांची मोफत सोनोग्राफी करण्यात आली आहे.

शासनाकडून ‘माता सुरक्षित तर घर’ सुरक्षित या नवरात्र निमित्त ९ दिवस विशेष अभियानास सुरुवात झाली. सहाव्या दिवशी सोलापूर महानगरपालिकेतील पंधरा नागरी आरोग्य केंद्रे, आठ प्रसूतिगृहे यामध्ये एकूण १८७४ गरोदर महिलांची तपासणी केली आहे. त्यामध्ये एकूण १५७ उच्च रक्तदाब, ५३ रक्तक्षय, ३२३ मधुमेह असणाऱ्या महिलांचा समावेश आहे. तसेच ६३ महिला प्रमाणापेक्षा कमी वजन आणि उंची असणाऱ्या गरोदर महिलांची विशेषत्वाने तपासणी करून औषधोपचार केले. १८१ महिलांना संदर्भित करून स्त्रीरोगतज्ञांमार्फत मोफत विशेष तपासणी केली.

या मोहिमेदरम्यान रक्ताच्या सर्व तपासण्या मोफत केेल्या आहेत. शहरातील सर्व महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा यासाठी आरोग्य विभागाची टीम प्रत्येक ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यामार्फतच प्रबोधन व माहिती पाेहोचवली जात आहे. शनिवार, दि. १ ऑक्टो. हा ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्या मातांचाही विशेष सन्मान नागरी आरोग्य केंद्राच्या मार्फत करण्यात आला. शिबिराचा जास्ती जास्त महिलांनी लाभ घ्यावा, आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्याधिकारी डाॅ.बसवराज लोहारे यांनी केले आहे.

आरोग्य विभागाकडून विविध उपक्रमांतून प्रबोधन
या शिबिरात महिलांचे प्रमाण वाढवावे यासाठी विविध उपक्रम घेण्यावर भर दिला जात आहे. तसेच समुपदेशनही केले जात आहे. तसेच किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिनची तपासणी, चांगला वाईट स्पर्श, सासू-सून मेळावा, पोषण आहार, मेंदी स्पर्धा, पानाफुलांची रांगोळी स्पर्धा, विविध थोर स्त्रियांची गरोदर मातांनी केलेली वेशभूषा आणि त्याचा रॅम्प वॉक असे विविध कार्यक्रम घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...