आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत प्रवास:75 वर्षांवरील नागरिकांना मोफत एसटी प्रवास सेवा सुरू ; सेवावाल्यांना पगारवाढ द्या

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाकडून ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना गुरुवारपासून सुरू झाली आहे.सवलत फक्त महाराष्ट्राच्या सीमेपुरतीच आहे. ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, तहसीलदार यांनी दिलेले ओळखपत्र, राज्य परिवहन महामंडळाद्वारे देण्यात येणारी स्मार्ट कार्ड, डीजी लॉकर, एम आधार आदी प्रकारची ओळखपत्र बंधनकारक असणार आहेत. त्याकरिता त्या त्या विभागातील आगार प्रमुखांना किंवा त्या त्या आगारातील समन्वयकांना भेटून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. वाहकाने मूळ तिकीट देणे बंधनकारक आहे. नेहमीच्या पद्धतीने तिकीट पंचिंग करून द्यावे, असेही सूचित करण्यात आलेले आहे.

सेवावाल्यांना पगारवाढ द्या
अनुकंपा तत्त्वाखाली सरळ सेवा भरतीद्वारे रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित अध्यादेशानुसार पगारवाढ दिली नव्हती. ती वाढ आता ५००० नुसार दहा वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांना व इतर वेगवेगळ्या चौकटीत बसणाऱ्या अनुकंपा व सरळ सेवा भरती कर्मचाऱ्यांना पगारवाढ द्या, असा आदेश महामंडळाने दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...