आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोपक्रम:शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 14विषयांचे मोफत प्रशिक्षण ; तरुणांना रोजगारभिमुख विकास योजना

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तांत्रिक प्रशिक्षण घेऊन तत्काळ रोजगार उपलब्ध व्हावा, तरुण स्वत:च्या पायावर उभा राहावेत यासाठी केंद्र शासनपुरस्कृत सामूहिक विकास योजना शासकीय तंत्रनिकेतमध्ये मोफत प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. विविध १६ प्रकारच्या अभ्यासक्रमाचे मुलांना मोफत प्रशिक्षण देऊन रोजगारभिमुख बनवण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. गरजू व होतकरू मुलामुलींनी शासकीय तंत्रनिकेतन, शांती चौक अक्कलकोट रोड येथे येऊन नोंदणी करावी, असे आवाहन प्राचार्यांनी केले.

शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालये असलेल्या ठिकाणी हे तांत्रिकचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. एकूण राज्यात हा अभ्यासक्रम ४३ ठिकाणी सुरू झाला आहे. त्यामध्ये साेलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालया समावेश आहे. सोलापुरातील तंत्रशिक्षण महाविद्यालयामध्ये एकूण ४१० जागा आहेत. त्या प्रत्येक कोर्ससाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यासाठी नववी व दहावी पास गरजू विद्यार्थ्यांनी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आपली नावे नोंदवावी. यामध्ये ग्रामीण भागातील मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर मुलं स्वत:चा उद्योग किंवा त्यांना तत्काळ रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...