आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संदीप शिंदे
कोरोना महामारीमुळे लाॅकडाऊन जाहीर झाले. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच माढा तालुक्यातील दारफळ(सिना)गावातील विशाल बारबोले या तरुणाला कारखान्यात चांगल्या हुद्यावर पाच आकडी पगाराची नोकरी मिळाल्याने त्याचा गावातील मित्र परिवाराने मुख्य चौकात मोठा फलक लावुन आनंद साजरा केला.
यात विशेष काय म्हणाल तुम्ही. विशाल ने जिद्दीने कारखान्यात नोकरी मिळवल्याने त्यांचा फोटोसह पगाराची रक्कम लिहुन अभिनंदन केलंय. पगाराची रक्कम जरी किरकोळ वाटत असली तरी मैत्रीचे नाते या निमित्ताने समोर आले. नोकरी मिळाल्याने विशाल चे आई वडील देखील आता मुलासाठी मुलीच्या शोधात लागलेत.
दारफळ गावचा रहिवासी असलेल्या विशालने दहावी उतीर्ण होऊन आयटीआयचा कोर्स पुर्ण केला होता. केवड/तुर्क पिंपरी येथील बबनराव शिंदे शुगर्स येथे विशाल नोकरीस लागला. अनेक वर्षे काम देखील केले. मात्र तिथे मिळणाऱ्या पगारावर तो समाधानी नव्हता. दुसरीकडे मोठा पगार अन् हुद्याच्या तो शोधात असायचा. अशातच आष्टी ता.मोहोळ येथे असलेल्या औदुंबरराव पाटील साखर कारखान्यात कर्मचारी भरती निघाली आणि विशाल तिथे गेला. याठिकाणी त्याची क्रेन ऑपरेटर पदी निवड झाली.
अनेक वर्षे मोठ्या पगारासाठी धडपडत असलेल्या आपल्या जिवलग मित्राला नोकरी लागल्याचे समजताच मित्र परिवाराने त्याचा गावातील मुख्य चौकात पगाराची रक्कम लिहुन अभिनंदन केले. हा आगळा वेगळा डिजिटल गावासह परिसरात चर्चेचा विषय ठरतोय.
विशाल अनेक वर्षापासून बड्या पगाराच्या नोकरीसाठी प्रयत्न करीत असायचा.त्याला आष्टी च्या कारखान्यात नोकरी मिळाल्याने जिवलग मित्राच्या नात्याने आम्ही मित्रानी पगाराची रक्कम लिहुन विशालचे अभिनंदन करुन आनंद साजरा केलाय-श्रीकांत आतकरे विशाल चा मित्र,दारफळ(सिना) ता.माढा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.