आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्थलांतरितांच्या पंढरीत गल दाखल; फ्लेमिंगो अद्याप आले नाहीत, पक्षीमित्रांना अजूनही प्रतीक्षा

वाशिंबे/ सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वातावरणातील अनियमिततेमुळे आपले आगमन लांबणीवर टाकलेले स्थलांतरित पक्ष्यांनी उजनी धरणावर येऊन दाखल झाल्याचे चित्र दिसत आहे. डिकसळ जवळच्या रेल्वे पूल परिसर, कोंडारचिंचोली, टाकळी, कात्रज, पोमलवाडी, केत्तूर इत्यादी उजनी धरणाच्या काठावरील गावांच्या विस्तृत पाणीपुरवठ्यावर समुद्र पक्षी अर्थात गलपक्षी मासेमारी करत तरंगताना दिसत आहेत.

दक्षिण रशिया, पूर्व मंगोलिया, पाॅलिआर्क्टिक, हिमालयातील मानसरोवर तसेच लडाख भागातील सरोवराला वीण घालणारे व सागरी किनाऱ्यावर मासेमारी करणारे विविध प्रजातींचे गलपक्षी उजनी जलाशयावर दरवर्षी हिवाळ्यात येतात. त्यापैकी ब्लॅक हेडेड गल पक्षी मागील आठवड्यात येऊन दाखल झाले आहेत. या हिवाळी पाहुणे पक्ष्यांना समुद्र पक्षी, केगो व कीर या नावानेही ओळखतात.

स्थलांतरित पक्ष्यांची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या उजनी धरणाच्या जलाशयावर स्थलांतरित पक्षी हिवाळ्यात येतात. या वर्षी हिवाळ्यातील हवामान पोषक नसल्यामुळे पक्ष्यांचे आगमन लांबले आहे. दीड महिना उशिराने गल पक्षी आले आहेत. त्यापाठोपाठ बदके येतील. मत्स्याहारी पक्षी येऊन दाखल झाल्याने उर्वरित पक्षी येण्याचे शुभसंकेत आहेत. -प्राचार्य डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक

जलाशयात खोल बुडून समुद्री गल मासे पकडतात
आकाराने घारीएवढे असलेले ब्लॅक हेडेड गल पक्षी उजनी धरणावर येण्याच्या सुरुवातीला पांढरेशुभ्र वाटतात; परंतु काही दिवसांत त्यांच्या डोक्यावर काळा डाग तयार होतो. परतीच्या प्रवासाच्या वेळी म्हणजे उन्हाळ्यापूर्वी डोक्याचा रंग तपकिरी होतो.

या पक्ष्यांमध्ये पंखांचा अग्रभाग पांढराशुभ्र असतो व त्यांची किनार गडद काळसर असतो. चोच पिवळ्या रंगाची असून तिचे टोक टाळ्या रंगाची असते. हे पक्षी दिवसभर पाण्याच्या पृष्ठभागावर अविरतपणे तरंगत राहत पाण्यात खोलपर्यंत बुडून माशांची शिकार करतात.

बातम्या आणखी आहेत...