आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तीची प्रतिष्ठापना:पाणीवेसच्या गणेश मंदिराची पूजा; साडेतेरा फूट उंच मूर्तीवर ४० किलो चांदीची आभूषणे

साेलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीवेस गणेश मंडळाची १९१६ मध्ये स्थापना करण्यात आली. १०६ वर्षांनंतर प्रथमच या मंडळाने मंदिर बांधले असून या वास्तूची पूजा सोमवारी माजी अध्यक्ष राहुल काशिद यांच्या हस्ते होणार आहे. तसेच गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनासुद्धा होणार आहे. पाणीवेस चौकात मुख्य रस्त्यावर हे सुंदर मंदिर उभारण्यात आले आहे.१९१६ मध्ये काशीनाथ वानकर, नामदेवराव नलवडे, विठ्ठल घाडगे यांच्यासह अनेक ज्येष्ठांनी मिळून पाणीवेस गणेश मंडळाची स्थापना केली.

सुरुवातीला दत्त मंदिराच्या बाजूच्या लहान गल्लीत किसन गवळी यांच्या जागेत गणेशाेत्सवात मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात होती. तेथेच एक लहान तात्पुरते मंदिर बांधले होते. दहा-बारा वर्षांनंतर दत्त मंदिरासमोर चौकात प्रतिष्ठापना करण्यात आली होती.दुपारी साडेबारा वाजता मंदिरामध्ये आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. ही मूर्ती साडेतेरा फूट उंच असून मूर्तीवर ४० किलो चांदीची आभूषणे आहेत. उत्सव अध्यक्षपदी प्रसाद पवार यांची निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...