आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयडीसी पोलिसांची कारवाई:मध्य प्रदेशातून पिस्तूल आणून विकणारी टोळी उघड; एकास सोलापुरात, तर तिघांना सातारा जिल्ह्यातून अटक

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशी पिस्तूल विकण्याच्या प्रयत्नातील सातारा जिल्ह्यातील चौघांना शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पाच देशी पिस्तूल व दहा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

प्रवीण राजा शिंदे (रा. वडूज ता. कराड, सोलापूर), स्वरूप विजय पाटील (रा तांबवे, कराड, सातारा), अमोल उर्फ पप्पू विलास खरात (दहिवडी, ता. माण, जि. सातारा), अमोल उर्फ पप्पू विलास खरात (दहिवडी, ता. माण, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. दुचाकीने (एमएच ११, सीआर ५२०९) निघालेल्या प्रवीण शिंदे याला संशय आल्याने एसव्हीसीएस प्रशालेसमोर सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित चौधरी व त्यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर तिघांची नावे त्याने सांगितली. पाटील, खरात आणि देशमुख या तिघांना सातारा जिल्ह्यात अटक केली. १२ ते २१ जूनदरम्यान टप्प्याटप्प्याने ही कारवाई करण्यात आली.

स्वरूप याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे, अमोलकडून एक पिस्तूल आणि दोन काडतुसे, ओंकारकडून दोन पिस्तूल आणि पाच काडतुसे असे एकूण पाच पिस्तूल व १० काडतुसे जप्त केल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी पत्रकारांना दिली. यावेळी पोलिस निरीक्षक राजन माने उपस्थित होते.

ही कारवाई पोलिस आयुक्त राजेंद्र माने, श्रीमती कडूकर, सहाय्यक आयुक्त संतोष गायकवाड, हवालदार राकेश पाटील, चेतन रुपनर, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, अय्याज बागलकोटे, अश्रुभान दुधाळ, अमोल यादव, किशोर व्हनगुंटी, सचिनकुमार जाधव, काशिनाथ वाघे, शैलेश स्वामी, शंकर याळगी, इकरार जमादार यांच्या पथकाने केली.

सोलापुरात विकणार होता
मध्य प्रदेशातून पिस्तूल आणल्याची माहिती समोर आली आहे. नेमके मध्य प्रदेशातील कोणत्या शहरातून आणले, सोलापुरात कोणाला पिस्तूल विकणार होते, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या चारही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पाटील याच्यावर सातारा, पुणे जिल्ह्यात चोरी, घरफोडी गुन्हे आहेत. आणखी तिघांवर गुन्हे दाखल आहेत का, याची माहिती सातारा पोलिसांकडून मागविण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...