आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभंडारकवठेजवळील पुलाच्या बांधकामावरील लोखंडी प्लेट्स चोरणाऱ्या टोळीला मंद्रूप पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी होटगी स्टेशन येथील सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन लाखांच्या लोखंडी प्लेट्स हस्तगत केल्या. न्यायालयाने सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अजय श्रीमंत कचरे (वय २३), भीमराव काशिनाथ भोसले (वय ३०), मोहसीन रमजान शेख (वय २६), रोहन सुनील तुपे (वय २७), आशुतोष संजय शिंदे (वय २४) सर्व जण रा. होटगी स्टेशन (ता. दक्षिण सोलापूर), रमजान सिराज मुल्ला (वय २८) रा. नवीन घरकुल, बागवान प्लॉट, कुंभारी असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
अधिक तपास केला तेव्हा या आरोपींनी झळकी पोलिस स्टेशन हद्दीतील एका बंधाऱ्याचे प्लेट्स चोरल्याची कबुली दिली आहे. हा गुन्हा उघडकीस आणण्याची कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पीएसआय अशोक ढवळे, सहाय्यक फौजदार संदीप काशीद, पोलिस शिपाई किरण चव्हाण, दिनेश पवार, संदीप काळे यांच्या पथकाने केली.
छोटा हत्ती वाहनात भरून ठेवल्या होत्या प्लेटस् : फिर्यादी राजाराम पांडुरंग राठोड काम करीत असलेल्या शांभवी कन्स्ट्रक्शनचे भंडारकवठे गावाजवळ ओढ्यावरील छोट्या पुलाचे काम सुरू आहे. यासाठी १७५ लोखंडी प्लेट व इतर सामान तेथे ठेवले होते. ५ डिसेंबर रात्री या प्लेट्स चोरीला गेल्या. माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी तपास सुरू केला. ग्रेड पीएसआय अशोक ढवळे व त्यांची टीम कामाला लागली. गुप्त माहितीच्या आधारे वरील सहा जणांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर एका छोटा हत्तीमध्ये भरून ठेवलेल्या प्लेट्स त्यांनी काढून दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.