आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला पावणेदोन लाख रुपयांचा गंडा:सांगलीत खोटे लग्न लावून गंडा; सोलापूरची मुलगी, आई कोठडीत

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीचे खोटे लग्न लावून देऊन दत्तात्रय नागेश हसबे (वय ३१, रा. हिवरे, ता. खानापूर) या तरुणाला पावणेदोन लाख रुपयांचा गंडा घातल्या प्रकरणात सोलापूरचे आरोपी न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती सांगली पोलिसांनी दिली.

जयश्री गदगे (रा. जुगुळ, ता. चिक्कोडी, कर्नाटक), सुनील शहा (रा. निपाणी, कर्नाटक), धानम्मा बिराजदार, मुलीची आई दीपाली शिंदे व मुलगी प्रियंका (सर्व रा. सोलापूर) अशी संशयितांची नावे आहेत. दीपाली व नववधू प्रियंका (वय २१) यांना अटक झाली आहे.हिवरे येथील दत्तात्रय हसबे या तरुणाचा विवाह जमत नव्हता. त्यामुळे त्याचा मित्र संजय खिलारी याच्या ओळखीच्या कर्नाटकातील जयश्री गदगे, या लग्न जुळविणाऱ्या महिलेकडे दोघे गेले. संबंधीत महिलेने सोलापूर येथे मुलगी आहे. परंतु घरच्यांना एक लाख व लग्न जुळविणारे सुनील शहा व धानम्मा यांना ७० हजार द्यावे लागतील, असे सांगितले. २७ जुलै रोजी रात्री गावात दोघांचा विवाह लावून दिला.३० जुलैला आई दीपालीने प्रियंकाला सोलापूर घेऊन जाण्याची तयारी केली. हसबे याला फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच विटा पोलिसात तक्रार दिली आणि आरोपींना अटक झाली.

बातम्या आणखी आहेत...