आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वच्छ भागत मिशन अंतर्गत शहरात चार कचरा (ट्रान्सफर स्टेशन) संकलन केंद्र उभे करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यासाठी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ५.७५ कोटी निधीस मान्यता दिली आहे. यातून शहरात सिव्हिल चौक येथील पालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाचे स्टोअर आणि अक्कलकोट रोड येथील मणिधारीसह चार ठिकाणी कचरा संकलन केंद्र उभे करण्यात येणार आहे.
पालिका उपसमितीच्या बैठकीत चार कचरा संकलन केंद्राच्या बांधकाम आणि यांत्रिक काम करण्यासाठी शासनाने मान्यता दिली. यात केंद्र सरकार ३५ टक्के तर राज्य सरकार २३.३३ टक्के तर पालिकेचा ४१.६७ टक्के हिस्सा असणार आहे. यातून पालिकेच्या हिश्श्यापाेटी २ कोटी ६९ लाख ६० हजार २५० इतकी रक्कम लागणार आहे पालिकेचा हिस्सा वाढीव खर्च १५ व्या वित्त आयोगातून वापरण्यात येणार आहे.
पालिका अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, मुख्य लेखा परीक्षक रूपाली कोळी, नगरसचिव प्रवीण दंतकाळे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, तत्कालीन नगर अभियंता संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, सहायक संचालक नगर रचना अधिकारी लक्ष्मण चलवादी यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.