आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू चोरी:चंद्रभागेत वाळू चोरीमुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये केली कचऱ्याची होळी

साेलापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रभागेच्या पात्रामध्ये वाळू चोरीमुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये कचऱ्याची होळी पेटवून महर्षी वाल्मीकी संघाच्या कार्यकर्त्यांनी चंद्रभागेतील वाळू चोरीचा निषेध केला. मंगळवारी शिमग्यादिवशीच चंद्रभागेच्या वाळवंटात पेटवलेल्या होळीसमोर प्रशासनाविरुध्द बोंबाबोंब केली. चंद्रभागेतील वाळूच्या खड्ड्यामुळे भाविकांना त्रास होतो, अनेक भाविकांचा जीवही गेला आहे, खड्डे पडू नये यासाठी शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत. शासनाला लवकरात लवकर जाग न आल्यास महर्षी वाल्मीकी संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करू, असा इशारा महर्षी वाल्मीकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...