आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम:गार्गीने 7 तास 7 मि. 7 सेकंद फिरवली लाठी, जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम, विक्रम रचणार

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाज सेवा मंडळ संचालित विडी घरकुल येथील राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालयाच्या पाचव्या इयत्तेत शिकणाऱ्या गार्गी राज चव्हाणने सलग ७ तास ७ मिनिटे व ७ सेकंद एका हाताने लाठी-काठी फिरवण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी तिचे प्रशिक्षक अश्विन कडलासकर यांनी ७५ मिनिटे काठी फिरवण्याचा उपक्रम केला होता. तिची या विक्रमाची नोंद ‘हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘द आयडियल इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त शिंदे चौक येथील शिवस्मारक सभागृहात ११ वर्षीय गार्गीने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, लाठी इंडियाचे महागुरू सुभाष मोहिते, तांत्रिक सदस्य मोहंमद रफी शेख यांच्या निरीक्षणाखाली हा विक्रम पूर्ण केला. सकाळी ११.४० वाजता तिने सुरुवात केली व सायंकाळी ६.४७ वाजता उपक्रम समाप्त केला. विक्रम केल्यानंतर तिची शिवस्मारक ते शिवाजी प्रशालेपर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...