आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एकरंगी ६४ लाख गणवेश खरेदीचा घाट रचण्यात आला. या निर्णयाने सोलापुरातील गारमेंट्स उत्पादक संपून जातील. ३० हजार कारागिर बेरोजगार होतील, शिक्षणमंत्र्यांना हा निर्णय रद्द करण्यास सांगा, अशा शब्दांत गारमेंट्स उत्पादकांनी कैफियत मांडली. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून प्रश्न सोडवू असे सांगितले.
या वेळी आमदार देशमुख, माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख हेही उपस्थित होते. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना गारमेंट्स उत्पादनातील सोलापूरचा वाटा विशद केलेला आहे. एकगठ्ठा गणवेश खरेदीने ही मंडळी संपुष्टात येतील. त्यांना मदतीची भूमिका घ्यायला सांगितली. आपण जोर लावला तर एकगठ्ठा गणवेशाचा निर्णय रद्द होईल, असे ते म्हणाले.
यंत्रमागांना वीज सवलत कायम ठेवा : चेंबरची मागणी
यंत्रमागांना मिळणारी वीज सवलत या पुढेही कायम ठेवण्याची मागणी केली. सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि यंत्रमागधारक संघाच्या वतीने शैलेश बच्चुवार, संजय कंदले, अंबादास बिंगी यांनी एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते, कुंभारी एमआयडीसी आदींबाबत मागण्या ठेवल्या. त्याचे निवेदन दिले.
उद्योजकांशी संवाद साधण्याचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द
दुपारी उद्योजकांशी संवाद ठेवला होता. डफरीन चौकातील आयएमए येथे आयोजन होते. ऐनवेळी ते रद्द केले. आमदार विजय देशमुख यांच्या राजवाडे चौकातील संपर्क कार्यालयात भोजनाचा कार्यक्रम होता. तिथे उद्योजकांनी बावनकुळे यांची भेट घेतली. गारमेंट्स उत्पादक दर्शन कोचर, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन करजोळे यांच्या शिष्टमंडळाने गणवेश खरेदीचा मुद्दा मांडला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरला आहेत. त्यांची भेट घेऊन एकगठ्ठा गणवेश खरेदी आणि त्याचे सोलापुरातील गारमेंट्स उद्योगावर होणारे परिणाम सांगतो. हा निर्णय रद्दच करावा, हीच माझी मागणी राहील. पुढे काय होईल, त्याचा तपशील आमदार विजयकुमार देशमुख यांना कळवतो.'' - चंद्रशेखर बावनकुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.