आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोहोळमधील कुरुल रस्त्यावर भारतीय स्टेट बँक व कुरुलमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी ४९ लाख २७ हजार ५०० रुपये चोरुन नेले. बुधवारी (दि. ८) पहाटे हा प्रकार घडला. या दोन्ही घटनांची येथील पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तर पंढरपूर रस्त्यावरील आयडीबीआय बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न कोणीतरी आल्याची चाहूल लागल्याने फसला.
मोहोळ- मंद्रूप महामार्गावरील कुरुल रस्त्यालगतच्या भारतीय स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी २६ लाख २८ हजार ५०० रुपये चोरुन नेले. बुधवारी पहाटे २.५६ च्या सुमारास ही घटना घडली. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हिरव्या रंगाचा स्प्रे फवारुन तो बंद केला. गॅस कटरने एटीएम कापून त्यातील २६ लाख २८ हजार ५०० रोकड चोरुन नेली. ६ जून रोजी कंपनीने ३६ लाख रुपये या एटीएम मध्ये भरले होते. बँक ऑफ इंडियाचे एटीएम गॅस कटरने कापून चोरट्यांनी २२ लाख ९९ हजारांची रोकड लंपास केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.