आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचाकोते परिवाराने तीन पिढ्यांपासून समाजसेवेचे घेतलेले व्रत अखंड सुरू असून, सोन्नलगी पुरस्काराच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववानांची पूजा त्यांनी बांधली आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले.
रामलिंगेश्वर शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ यांच्या वतीने आयोजित सोन्नलगी पुरस्काराचे वितरण श्री. शिंदे आणि श्रीकंठ शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते तळेहिप्परगा करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. स्वर्गीय बाबूराव चाकोते यांचा समाजसेवेचा वारसा विश्वनाथ चाकोते आणि आता त्यांची दोन्ही मुले पुढे यशस्वीपणे नेत आहेत.आपल्या कर्तृत्वाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या रत्नांचा गौरव चाकोते परिवाराकडून करण्यात येतो, असे श्री. शिंदे म्हणाले. प्रारंभी विश्वशंकर चाकोते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. नसीमा पठाण यांनी मनोगत व्यक्त केले.
पुरस्काराला उत्तर देताना श्री. बैजल म्हणाले, राजकीय आणि धार्मिक गुरूंच्या हस्ते पुरस्कार मिळाल्याने राजमान्यतेसोबत देव मान्यताही मिळाली, हे माझे भाग्य आहे. या वेळी राम रेड्डी, मारुती चितमपल्ली, संजय कुलकर्णी, सुनंदा महाराणा यांची भाषणे झाली. समाजकारण, राजकारण आणि धर्म कारणाचा बॅलन्स चाकोते परिवाराने योग्य पद्धतीने सांभाळला. गुणांचा गौरव त्यांच्याकडून दरवर्षी करण्यात येतो, असे श्रीकंठ शिवाचार्य महाराज यांनी आशीर्वचनातून सांगितले. विश्वराज चाकोते यांनी आभार मानले. वीणा बादरायणी यांनी पसायदान म्हटले. सूत्रसंचालन माधव देशपांडे यांनी केले.
यांचा झाला पुरस्काराने सन्मान
उद्योजक राम रेड्डी यांना सोन्नलगीरत्न, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना सोन्नलगी गौरव, पोलिस आयुक्त हरीश बैजल यांना सोन्नलगीश्री, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाचे अधीक्षक संजय नाना कुलकर्णी यांना सोन्नलगी सन्मान आणि सौंदर्यशास्त्राच्या तज्ज्ञ सुनंदा महाराणा यांना सोन्नलगी सरस्वती हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.