आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदेची मुदत वाढवली:शाळेच्या पहिल्या दिवसी मुलांना मिळणार पोषण आहार, निविदेसाठी मिळाली मुदतवाढ

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड महामारीच्या काळात मुलांना पोषण आहार शिजवून देता आला नाही.तरी आता शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरु झालेल्या आहेत. तरी 13 जूनपासून शाळा सुरु होणार आहेत. तरी शाळेच्या पहिल्या दिवसापासून मुलांना पोषण आहार मिळाला पाहीजे. यासाठी शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहारासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने निविदा मागवण्यात आले होते. या निविदाची मुदत 6 जून पर्यंत मुदत दिली आहे.

महानगरपालिकेकडून निविदासाठी 3 जूनपर्यंत मुदत होती. ती मुदत संपली असून स्थानिक बचत गटांना प्रोत्साहन मिळण्याकरिता व बचत गटांना जास्तीत जास्त या मध्ये सहभागी होण्याकरिता या निविदाची मुदत 3 दिवसांनी वाढवण्यात आले आहे. तरी शहरातील बचत गट तसेच त्यांच्या प्रतिनिधींना मुदतीच्या आत निविदा भरावी. शासन निर्णयानुसार 13 जून पासून शालेय पोषण आहार नियमित सुरू होणे अपेक्षित असल्याने या निविदा तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. तरी शहरातील बचत गटांना जास्तीत जास्त सामावून घेण्यासाठी शालेय पोषण आहाराच्या निविदा मध्ये आयुक्त यांनी काही अटी व शर्ती बदल करण्यास मान्यता दिली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वेळेत आणि शासन नियुक्त केलेल्या तारखेप्रमाणे चांगल्या दर्जाच्या शालेय पोषण आहार देण्याची क्षमता असणाऱ्या बचत गटांनी या निविदामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपायुक्त विद्या पोळ यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...