आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय मुला-मुलींसाठी सायकल बँक संकल्पना:माळशिरस तालुक्यातून 125 विद्यार्थ्यांना सायकली भेट; 3 हजार सायकली देण्याचा संकल्प

सोलापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रयत्नातून विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या सायकल बँकेस माळशिरस तालुक्याने 125 सायकली भेट दिल्या आहेत. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या प्रमाणात सायकली दिल्याची नोंद झाली आहे. याकामी नेवरे येथील सरपंच सविता पाटील व त्यांचे पती सुरेश पाटील यांनी मोलाची मदत झाली आहे. भविष्यात माळशिरसमधील डॉटर्स मॉम संस्थेच्या माध्यमातून मुलींसाठी 3 हजार 900 सायकली देण्याचा संकल्प याप्रसंगी केला आहे.

शालेय मुला-मुलींसाठी सायकल बँक ही संकल्पना माळशिरस तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. नेवरे येथील जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी सायकल देण्याचा कार्यक्रम आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सायकल बँकेच्या उद्घाटनासह अंगणवाडी इमारत, चार शाळेच्या नवीन खोल्याचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी डॉटर्स मॉम संस्थेच्या शितलदेवी मोहिते पाटील, गटविकास अधिकारी विनायक गुळवे, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिवतेजसिंह मोहिते पाटील, पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, सुरेश पाटील, प्रतापराव पाटील, संग्राम दळवी उपस्थित होते.

शहरी नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील नागरिक मनाने खूप मोठे असल्याचे या माध्यमातून दिसून आले आहे. नेवरे सारख्या गावात 125 सायकलची बँक एकाच वेळी सुरू झाल्याने त्यांना सहकार्य करणारे सर्व नागरिक कौतुकास पात्र आहेत. आम्ही डॉटर्स मॉम फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्यातील 3 हजार 900 मुलींना पुढील वर्षभरात सायकल बँकेच्या माध्यमातून सायकली देण्याचे ध्येय ठेवले आहे.- शीतलदेवी मोहिते पाटील, अध्यक्ष डॉटर्स मॉम फाउंडेशन

राजकारणात खुर्चीचा मोहामुळे अनेकजण काम न करता फक्त खुर्चीवर बसण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु नेवरे येथील सुरेश पाटील व त्यांच्या पत्नी व सरपंच सविता पाटील यांनी मागील पाच वर्षातील सरपंच पदाचे मानधनातून 1 लाख 80 हजार रुपयातून विद्यार्थ्यांसाठी 75 सायकली दिल्या आहेत. त्यांच्या औदार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. याकामी संग्राम दळवी यांची मेहनत कामी आली आहे.

बातम्या आणखी आहेत...