आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजन यांचे निर्देश:ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, पुण्यात CEOची राज्यस्तरीय परिषद

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील नागरिक रोजगारासाठी शहराकडे वळतात. शहरातील वाढता ताण कमी करण्यासाठी ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधायचा आहे. ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यास पिण्यासाठी स्वच्छ पाणी, स्वच्छतागृह युक्त गाव या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झालीच पाहिजे, अशा सूचना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

ग्रामविकास व पंचायत राज विभागातर्फे राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, उपायुक्त (विकास), उपायुक्त (आस्थापना), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची राज्यस्तरीय परिषद पुणे येथील ऑर्किड हॉटेल येथे आयोजित करण्यात आली. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

याप्रसंगी अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, यशदाचे उप महासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नतीचे अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर आदी उपस्थित होते.

उमेद अभियानाद्वारे महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बचत गट उभे राहिले. या बचत गटाच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्यांना बाजारपेठ, दुकाने मिळाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. लवकरच ग्राम राजस्व अभियानाची सुरुवात करण्यात येत आहे. राज्यातील मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तेथील नागरिक, महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडून खूप अपेक्षा आहेत. ग्रामीण गृहनिर्माणात महाराष्ट्र देशामध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. प्रत्येकाला पक्के घर मिळावे अशी शासनाची भूमिका आहे. ग्रामीण घरकुलांसाठी आपल्याला गतीमान, गुणवत्तापूर्वक कामांची आवश्यकता आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भूमिका ‘मॉनिटर’ची

केंद्र शासनाकडून आता ग्रामपंचायतीला थेट पैसे येतात. त्यामुळे योजनांची कामे गतीने होतात. हे होत असताना कामे अधिक चांगली होतील, गैरप्रकार होणार नाही हे पाहण्यासाठी मॉनिटरची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच ग्रामविकास विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असल्याचे, महाजन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...