आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात गोवा बनावटीची दारू जप्त:3 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त; संशयित आरोपीस 2 दिवस एक्साईज कोठडी

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शनिवारी रात्रीच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा व कळमण या ठिकाणी गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेली विदेशी मद्य जप्त केले आहे. या कारवाईत एकूण तीन लाख 48 हजार 990 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक ब सदानंद मस्करे यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार त्यांनी 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास सोलापूर -बार्शी रोडवरील वडाळा गावाचे हद्दीत एका कारमधून गोवा राज्याच्या विदेशी मद्याची वाहतूक होणार आहे, अशा मिळालेल्या खात्रीलायक बातमी नुसार सापळा रचला असता त्यांना संशयित वाहन मारूती 800 MH 12 BV 3659 सोलापूरकडून बार्शीकडे येताना दिसताच त्यांनी वाहनास अडवून त्याची झडती घेतली असता वाहनात वाहन चालक श्रीनिवास विठ्ठल वाघमारे, राहणार कळमण ता. उत्तर सोलापूर या इसमाच्या ताब्यातून ओ चॉईस ब्रॅंडच्या कागदी बॉक्समध्ये रिफीलिंग केलेल्या 180 मिली क्षमतेच्या मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 48 बाटल्या व रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या 48 बाटल्या अशा विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आल्या.

पुढील तपासात आरोपीच्या कळमन (ता. उत्तर सोलापूर) येथील राहत्या घरातून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने गोवा राज्य निर्मित 750 मिली क्षमतेच्या ओ चॉईस ब्रॅण्ड विदेशी मद्याच्या191 बाटल्या, मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 192 बाटल्या, महाराष्ट्र राज्याच्या विदेशी मद्याच्या विविध ब्रॅंडच्या रिकाम्या बाटल्या व बुचे जप्त केले.

या कारवाईत वाहनाच्या दीड लाख किमतीसह एकूण तीन लाख 48 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी श्रीनिवास वाघमारे याचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा चे कलम 65, 81, 83, 90 व 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 20 नोव्हेंबर रोजी दारूबंदी न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्याला दोन दिवसाची एक्साईज कस्टडी सुनावली असून गुन्ह्याचा तपास दुय्यम निरीक्षक ब 1 विभाग गणेश उंडे हे करीत असून ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, उप अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक अंकुश अवताडे, गणेश उंडे, सहायक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, जवान अनिल पांढरे, प्रशांत इंगोले इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख व संजय नवले यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...