आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा मृत्यू, मृतदेह मोदी रेल्वे पुलावर सापडला

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भगवान शिंदे यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही

गोकुळ शुगसॅचे चेअरमन भगवान दत्तात्रय शिंदे (वय ६२, रा. पंखा बावडीजवळ, विद्याविहार, रेल्वे लाईन, सोलापूर) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाशेजारी सापडला आहे. रेल्वेच्या धडकेने त्यांचा मृत्यू झाला आहे की कसे याचा शोध पोलिस घेत आहेत. हा प्रकार सोमवारी सकाळी सातच्या सुमाराला मोदी रेल्वे पुलावरील रूळावर घडला. प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या की अन्य कारण आहे याचा शोध सुरू आहे. याबाबत लोहमार्ग पोलिसात प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे. भगवान शिंदे यांचा दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे गोकुळ शुगर्स नावाचा प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना आहे. अनेक वर्षापासून ते कारखाना चालवतात.

मिळालेली माहिती अशी की, शिंदे हे सकाळी वॉकिंगला जातो म्हणून घराबाहेर पडले. काही वेळाने त्यांचा मृतदेह मोदी रेल्वे पुलावर सापडला. लोहमार्ग पोलिसांना सकाळी सात-साडेसातला याची माहिती मिळताच घटनास्थळी आले. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनसाठी आणले. नातेवाईकांना ही माहिती कळताच तेही शासकीय रुग्णालयात आले. मृतदेहाची ओळख पटली. सहायक फौजदार प्रल्हाद चव्हाण तपास करीत आहेत.

भगवान शिंदे मूळचे अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथील रहिवासी आहेत. गावात शेती आहे. त्यांचा सोलापुरात सुरुवातीला लॉटरीचा व्यवसाय होता. नवीपेठेत कपड्याचे दुकान आहे ते भाऊ चालवितात. गोकुळ शुगर नावाने खासगी साखर कारखाना त्यांनी उभारला होता. शिंदे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन विवाहित मुली, तीन भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांना विचारले असता, प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यू म्हणून याची नोंद घेण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतर या घटनेची सत्यता समोर येईल असे ते म्हणाले. अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे. चिठ्ठी सापडली नाही. अंगावर संशयास्पद व्रण नाहीत.

मृत्युची माहिती कळताच शासकीय रुग्णालयात गर्दी

भगवान शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच शासकीय रुग्णालयात नातेवाईकाची गर्दी झाली होती. भाऊ, पुतणे आले होते. मृतदेह पाहून त्यांनाही शोक अनावर झाला होता. पोलिसांनी सायंकाळी उशिरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...