आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींना सूचना:उत्पन्न वाढीसाठी शासकीय जागांवर फळझाड लागवडीचे चांगले पर्याय; मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामींच्या सूचना

सोलापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थापनेस ६० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ग्रामपंचायतींच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी सार्वजनिक जागांवर फळबाग करण्याची मोहीम सोलापूर जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे. आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी स्थानिक प्रजातींच्या फळरोपांची लागवड करण्यासह, परिसर वृक्षाच्छादित करण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींमध्ये अभियान राबवण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

या कार्यक्रमाची अंमलबजावणी मे महिन्यापासून करण्यात येत आहे. या मध्ये गट लागवड करण्यात येईल. गायरान, गावठाण जमीन, शासकीय व निमशासकीय जमीन, सामुहिक जमिन व शैक्षणिक संस्थांच्या जमिनीवर फळबाग लागवड करण्यात येणार आहे.

विखुरलेल्या स्वरूपात वृक्षलागवडीचे नियोजन आहे. याबाबतच्या सूचना तालुका व गावस्तरावर देण्यात आल्या आहेत. वैयक्तिक लाभार्थींच्या जमिनीवर देखील वृक्षलागवड करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांच्या बांधावर व पडिक जमिनीवर देखील वेळ लागवड करता येते. कृषी विभागाच्या धोरणानुसार किमान नऊ महिन्यांची वाढ झालेल्या फळ रोपांची लागवड करावी, अशाही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...