आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात होणार दोन उड्डाणपूल:भूसंपादनासाठी 25 कोटींचे कर्ज घेण्यास शासनाची मान्यता

सोलापूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित फोटो - Divya Marathi
संग्रहित फोटो

शहरात दोन उड्डाणपूल बांधण्यासाठी येणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रक्रिया सुरु आहे. महापालिकेच्या वतीने भूसंपादन प्रक्रिया सुरु असून, जागेचे मुल्यांकन करण्यात येत आहे. सुमारे 117 कोटी रुपये या कामासाठी लागणार आहेत. उड्डाणपुल भूसंपादनासाठी 25 कोटी कर्ज घेण्यास शासनाची मान्यता मिळाली. शासनाच्या जागेसाठी टीडीआर, आरसीसी मिळणार आहे.

दोन उड्डाणपूल होणार

शहरात दोन उड्डाणपूल होणार त्यापैकी 70 टक्के निधी शासन देणार असून, पालिका हिस्सापोटी 35 कोटी भरणार आहे. यापैकी 25 कोटी रुपये महापालिका मुफ्रा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणार आहे तर शासन अनुदान 10 कोटी मिळणार आहे. शासनाच्या जागेचे मोबदला देणे असून, त्यांना टीडीआर किंवा आरसीसी द्यावे असे शासनाने सांगितले. यामुळे उड्डाणपूल भूसंपादाचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्गावर आहे.

जुना पुणे नाका आणि जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे दोन उड्डाणपूल होणार आहे. यासाठी आवश्यक असलेला जागेची मोजणी व मुल्याकन करण्यात येत आहे. दोन दिवसात मोजणी संपेल आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुल्याकन निश्चीत करुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे भूसंपादनसाठी पाठवण्यात येणार आहे.

उड्डाणपुलाबाबत नगरविकास खात्याकडे यापूर्वी बैठक झाली होती. त्यातील चर्चेचा निर्णय शासनाने महापालिकेस कळविला आहे. शासकीय जागा असेल तर त्यांना टीडीआर किंवा आरसीसी द्यावे असे शासनाने सांगितले. त्यानुसार ते दिले जाणार आहे. खासगी जागा धारकांची सुनावणी घेण्यात आले. त्यानुसार पालिका निर्णय घेणार आहे.

25 कोटी कर्जास मान्यता

117 कोटी रक्कम भूसंपादास लागणार आहे. यापैकी 70 टक्के रक्कम शासन देणार आहे. महापालिकेचे 30 टक्के हिस्सापैकी 35 कोटी रक्कम असून, यापैकी मुफ्रा या वित्तीय संस्थेकडून 25 कोटी कर्ज काढण्यात येणार आहे. 10 कोटी रुपये शासन अनुदान मिळेल अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

मोजणी दोन दिवसात संपेल

भूसंपादन करण्यासाठी जागेचे मोजणी संपेल. त्यानंतर त्याचे मुल्याकन निश्चीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम रक्कम निश्चीत होईल. बुधवारी सात परिसरात मोजणी करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...