आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना फटका:सरकारचा नवा गडी नवा राज खेळ नव्या यादीसाठी 47 कामे रखडली

चंद्रकांत मिराखोर | सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे सरकार जाऊन आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने विकासकामांबाबत खेळातील ‘नवा गडी नवा राज’ नियम लागू केला आहे. त्यामुळे शहरातील ३९ कोटींची ४७ विकासकामे रखडली आहेत. नगरोत्थान योजनेतील या कामांची यादी महापालिकेने दहा महिन्यांपूर्वीच पाठवली होती. मात्र, आता नव्या पालकमंत्र्यांनी कामांची पुन्हा नवी यादी मागितली आहे. यात विकासकामांचा खेळ होत आहे.

शहरातील विकास कामाच्या यादीबाबत राजकीय संघर्ष सुरू आहे. महापालिका प्रशासनाने जानेवारीत पाठवलेल्या ३९ कोटी रुपयांच्या ४७ रस्ते आदी कामांची यादी लटकण्याची शक्यता आहे. तीन आमदारांनी ३२५ कामांची यादी नव्याने दिली. पण महापालिका प्रशासनाकडून ४७ कामांचा प्रस्ताव यापूर्वी पाठवला. तो प्रस्ताव तांत्रिक कारणाने लटकण्याची शक्यता आहे. आम्ही यापूर्वीच प्रस्ताव पाठवल्याचे आयुक्तांनी सांगितले.

गरज पडल्याने नव्याने प्रस्ताव महापालिका करणार आहे. शहरातील विकासकामांच्या यादी मंजुरीचा प्रवास दहा महिन्यापासून सुरू आहे. यास सरकार बदलाचे कारण आहे. जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतील ४७ कामांची यादी जानेवारीत यादी दिली. फेब्रुवारीत महापालिकेच्या सभागृहात ठराव झाला. जून महिन्यात तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजूरी दिली. जुलै महिन्यात नव्या सरकारने स्थगिती दिली. आक्टोबर महिन्यात नव्या पालकमंत्र्यांनी नव्याने यादी मागितली, असा प्रवास आहे.

या भागातील आहेत कामे
अशोक चौक, दयानंद काॅलेज ते शिवाजी चौक, लालबहाद्दूर शास्त्री प्रशाला ते गेट्याल चौक, कुमठा नाका ते ७० फूट रोड, बोल्ली मंगल कार्यालय, कुमठे, पावन गणपती ते आडवा नळ, कुंभारवेस ते पमा कोळी शाॅपिंग सेंटर, आसरा चौक ते साईनगर, रामवाडी, मजदुर क्लब ते कालिका मंदीर, सम्राट चौक ते बाळीवेस, गोंधळीवस्ती, बेडर पूल ते जंगदबा चौक, कोंतम चौक ते बलिदान चौक, मरहबा फक्शन हाॅल ते सितारा चौक, आदित्य नगर ते साई सृष्टी नगर, आसरा चौक ते महिला हाॅस्पिटल, बसवेश्वर नगर, सम्राट चौक, शोभादेवी नगर, वैष्णवी प्लाझा, गोंधळीवस्ती, राजीव नगर, किसान नगर, मल्लिकार्जुन नगर, नई जिंदगी ते सहारा नगर, अमन चौक ते मदिना चौक.

सभागृहाने सुचवली १२० कामे
प्रशासनाने ४७ कामे सुचवली होती. महापालिका सभागृहात १२० कामांचा ठराव करून कामांची यादी पाठवली. त्यापैकी ९८ कामांची आवश्यकता होती. चार रस्ते अन्य योजनेतून मंजूर होते. १३ कामे झालेली होती. ती पुन्हा नव्याने यादीत घालण्यात आली. ती यादी रद्द करण्यात आली आहे.

प्रशासनाने निकड म्हणून सुचवले : महापालिका प्रशासनाने सुचवलेल्या ४७ कामे निकड म्हणून सुचवले असून, दहा महिन्यात काही रस्त्याचे कामे झाले आहेत. ते वगळता अन्य २५ कोटींचे कामे करणे असून, त्या कामास मंजुरी देणे आवश्यक आहे.

प्रस्ताव पाठवला आहे
जिल्हा नियोजन समितीकडे महापालिकेकडून यापूर्वीच प्रस्ताव पाठवला आहे. त्यात रस्ते, ड्रेनेजसह मूलभूत सुविधेचे कामे आहेत.’’ -पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

बातम्या आणखी आहेत...