आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिटेक्निक:शासकीय पॉलिटेक्निक, 25 टक्के जागावर प्रवेश

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाॅलिटेक्निक डिप्लोमा प्रवेशासाठी केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्या कॅप राउंडनुसार प्रवेशप्रक्रियेस प्रारंभ झाला. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत २५ टक्के प्रवेश पूर्ण झाले आहेत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३० अाॅगस्टपर्यंत मुदasत आहे. उर्वरित दोन दिवसांत आणखी प्रवेश होतील, अशी माहिती प्रवेश समन्वयक प्रा. सापटणेकर यांनी दिली. ३१ ऑगस्ट रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध होईल. प्रवेशाच्या सविस्तर माहिती https:/dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेशाचा ट्रेंड पाहिला तर कॉम्प्युटर व माहिती तंत्रज्ञान या अभ्यासक्रम पसंतीचा बनतो आहे. पण प्रत्येक ट्रेंड हा महत्वाचा आहे.

सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल या शाखाही तितक्याच महत्त्वपूर्ण व रोजगारक्षम आहेत. कोरोना काळ, वर्क फ्रॉम होममुळे ट्रेंड बदलला आहे. मात्र बेसिक शाखांना नेहमीच उत्तम प्लेसमेंटची खात्री असते. शिवाय या शाखेतील विद्यार्थ्यांना कंत्राटदार, उद्योजकतेच्या असंख्य संधीही उपलब्ध हाेत असतात. अर्थात डिप्लोमा प्रवेशासाठीची शाखा निवड ही आगामी काळातील बदल लक्षात घेऊन केला तर उपयुक्त ठरतो.

आता प्रवेश घेतलेला विद्यार्थी तीन वर्षानंतर जेव्हा पदविका घेऊन बाहेर पडेल तेव्हाचा ट्रेंड लक्षात घेतला पाहिजे. बेसिक शाखेतून पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणे नेहमी फायदेशीर ठरते, हाही विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...