आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादुर्भाव:घाटे अळीमुळे हरभरा ‘घाट्यात’, बदलत्या‎ वातावरणामुळे खरिपातील पिकं धोक्यात‎

सोलापूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरिपातील साडेचार लाखांहून अधिक‎ हेक्टरवरील पिकांना यंदा फटका बसत‎ आहे. पडणारे धुके, अचानक वाढणारा‎ गारवा, गरम होणे अशा विविध‎ कारणांमुळे यंदाची रब्बी पिके अडचणी‎ येण्याची शक्यता आहे. गहू पीक अडचण‎ असतानाच हरभरा पिकावर घाटे अळीचा‎ प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.‎ जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ६० हजार‎ ९१८ हेक्टर क्षेत्र आहे. त्यामध्ये हरभऱ्याचा‎ पेरा ७२ हजार हेक्टरवर करण्यात आला‎ आहे. जिल्ह्यामध्ये हवामानातील‎ बदलामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा ‎ ‎ प्रादुर्भाव दिसून येत आहे. हे पीक सध्या‎ काही ठिकाणी वाढीच्या तर काही‎ ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. मोठ्या ‎ ‎ झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून ‎ ‎ आतील दाणे खाऊन ते पोखरतात. एक‎ अळी साधारण ३० ते ४० घाट्यांचे‎ नुकसान करत आहे.‎

कीटकनाशक फवारणी करावी‎ गारवा, दिवसभर उन्हाची तीव्रता, मध्येच ढगाळ‎ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.‎ हरभरा पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. ती‎ तुरी, हरभरा, उन्हाळी भेंडी व इतर पिकांवर वाढते.‎ वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी ज्वारीवर लष्करी‎ अळीचा प्रभाव दिसत असून त्यावर नियंत्रणासाठी‎ किटकनाशकांची फवारणी करावी.‎ डॉ. समाधान जवळगे, किटकशास्त्र अभ्यासक, कृषी‎ विज्ञान केंद्र‎

बातम्या आणखी आहेत...