आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली अकलूज ग्रामपंचायत परत एकदा भाजपने काबीज केली आहे. भाजपच्या विजयसिंह मोहिते-पाटील गटाने 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायतीत 16 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 13 जागांवर विजय मिळवला. तर, एकजागा बिनविरोध झाली आहे.
अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत जनसेवा संघटनेते नेते धवलसिंह मोहिते पाटील विरुद्ध माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी थेट लढत पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत 17 जागांपैकी 14 जागा भाजप विजयसिंह मोहिते-पाटील गटाला मिळाल्या आहेत. तर 3 जागांवर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलला मिळाल्या आहेत.
माळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व
तिकडे, माळशिरस तालुक्यातही मोहिते-पाटील गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींपैकी हाती आलेल्या निकालानुसार, 22 जागांवर मोहिते-पाटील गटाचा विजय झाला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.