आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांची जागेवरच नाेंदणी:‘दिव्य मराठी प्राॅपर्टी एक्स्पाे’ला उदंड प्रतिसाद अन् थाटात सांगता

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरस्वती चाैकातील ड्रीम पॅलेसमध्ये झालेल्या दिव्य मराठी प्राॅपर्टी एक्स्पाेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. रविवारी त्याची थाटात सांगताही झाली. तीन दिवस झालेल्या या प्रदर्शनाला सुमारे हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. प्रकल्प पाहून आलेल्या ग्राहकांनी प्रदर्शन स्थळीच मागणीही नाेंदवल्या.

न्यू इथाॅस रिअॅल्टी सहप्रायाेजक असलेल्या या एक्स्पाेला वीर हाऊसिंग प्राेजेक्टने पाॅवर्ड केले हाेते. शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांसह पुण्यातील बांधकाम कंपन्यांनीही त्यात सहभाग घेतला हाेता. एकूण १९ स्टाॅल्समधून त्यांनी ग्राहकांना माहिती दिली. त्यांच्या प्रकल्पातील घरे, खुला भूखंड खरेदी करण्यासाठी भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँकेचे प्रतिनिधी हाेते. त्यांनीही स्वतंत्र दालने सुरू करून ग्राहकांना आकर्षक गृहकर्जांची माहिती दिली. राष्ट्रीयीकृत बँकांकडील गृहकर्जे स्वस्त झाल्याने ग्राहकांनी त्यांच्या मदतीने आपल्या पसंतीच्या घराची मागणी नाेंदवली.

चांदीच्या नाण्यांची भेट या प्रदर्शनाला भेटी देणाऱ्यांना साेडत पद्धतीने भाग्यवान विजेते ठरवण्यात आले आहे. दरराेज तीन साेडत काढण्यात आल्या. विजेत्यांना गणेश रामचंद्र आपटे सुवर्णपेढीच्या वतीने चांदीचे नाणे देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...