आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:थोर साहित्यिक सी. नारायण रेड्डी यांना तेलुगु भाषा ग्रंथालयातर्फे अभिवादन

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेलुगु साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दिवंगत साहित्यिक पद्मश्री डॉ. सी. नारायण रेड्डी यांचा जन्मदिवस तेलुगु भाषा अभिवृद्धी ग्रंथालयात साजरा झाला. एन. टी. रामाराव अभिमान संघाच्या वतीनेही या वेळी अभिवादन करण्यात आले. ग्रंथालयाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्याध्यक्ष बालराज बोल्ली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

संस्थेचे सचिव तिपण्णा गणेरी यांनी डॉ. रेड्डी यांच्या आठवणी सांगितल्या. १९९६ मध्ये सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात तेलुगु व मराठी साहित्यावर चर्चासत्र झाले होते. त्यासाठी डॉ. रेड्डी आले होते, असे म्हणाले. या वेळी प्रभाकर भीमनाथ, कवयित्री रेणुका बुधारम, राजश्री बुधारम, अंबादास फलमारी, आेमप्रकाश कमटम, नागनाथ अक्कल, रामुलू पोतू, तिपण्णा चिनराज आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...