आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांचे आठवावे रूप:संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा; महाराजांच्या शौर्याचे केले स्मरण

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरात गुरुवारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवप्रताप दिन साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

आजच्या दिवशी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खान याचा गनिमी कावा आणि युक्तीने वध करून स्वराज्यावर आलेले संकट छत्रपती शिवाजी महाराजांनी दूर केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात स्वराज्य निर्माण करत असताना अनेक जीवघेणी संकट आली पण त्यापैकी सर्वात मोठे संकट म्हणजे अफजलखानाने स्वराज्यवर केलेली स्वारी होती.

अफजलखान चालून आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धीचातुर्य राजकारण अचूक नियोजन धाडस आणि पराक्रमाच्या जोरावर या संकटाचा न डगमगता धैर्याने सामना केला. आणि अफजलखानाचा वध केला याप्रसंगी महाराजांनी कोणतेही जात पात धर्म न बघता छत्रपती शिवाजी महाराजांवर वार करणाऱ्या अफजलखानाचा वकील स्वराज्यद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी याला देखील ठार केले.

मराठा सैन्याने अफजल खानाच्या सैन्याला देखील चारी आसमान दाखवत चित केले. हा प्रसंग म्हणजे स्वतः आपला राजा आपले प्राण धोक्यात घालून स्वराज्यासाठी लढत आहे हे पाहता रयतेनही त्यागाची भूमिका घेत आपल्या राजासाठी स्वतःचा जीव अर्पण करण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित इतिहासाची पहिली घटना असावी ज्या घटनेनंतर सामान्य लोकही आपल्या राजासाठी जीव द्यायला कायम तयार झाले अफजलखानाचा वध म्हणजे मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणारी आत्मविश्वास वाढवणारी घटना होती. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानला छत्रपती शिवरायांनी ठार मारून स्वराज्यावर आलेले मोठे संकट परतावून लावले. त्यामुळे जनमानसात असामान्य असा आत्मविश्वास आणि स्वाभिमान निर्माण झाले होते. शिवप्रताप दिन साजरा करून, राजांच्या शौर्याचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, उपाध्यक्ष सीताराम बाबर, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपशहरप्रमुख गजानन शिंदे, संघटक दत्ता जाधव, नागराज जाधव उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...