आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नृत्य स्पर्धा:अकलूजला 23 पासून समूह नृत्य स्पर्धा

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने दि. २३ ते २५ डिसेंबर कालावधीत शालेय मुला मुलींच्या समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्ष स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी दिली.

सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील स्पर्धेचे हे ४२ वे वर्ष आहे. या स्पर्धेमुळे अनेक ग्रामीण व स्थानिक कलाकारांना मोठे व्यासपीठ मिळाले आहे.

पाच गटांत स्पर्धा
या तीनही विभागासाठी गट क्रमांक एक इयत्ता पहिली ते चौथी कॅसेट गीत, गट क्रमांक दोन इयत्ता पाचवी ते सातवी कॅसेट गीत, गट क्रमांक तीन इयत्ता आठवी ते दहावी कॅसेट गीत (लोकनृत्य ग्रामीण व अति ग्रामीण) गट क्रमांक तीन इयत्ता आठवी ते दहावी कॅसेट गीत (पाश्चिमात्य नृत्य शहरी) गट क्रमांक चार इयत्ता पाचवी ते दहावी कॅसेट गीत (प्रासंगिक नृत्य संवाद थीम डान्स) गट क्रमांक पाच इयत्ता ११ वी ते सर्व महाविद्यालयीन गट प्रासंगिक नृत्य थीम डान्स असे गीत प्रकार आहेत.

एका गीतात १६ विद्यार्थी
स्पर्धेतील एका गीतात कमीत कमी ६ व जास्तीत जास्त १६ कलाकार सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त १० मिनिटांचा कालावधी सादरीकरणासाठी दिला जातो. स्पर्धेसाठी २१ समित्या असल्याचे सचिव पोपटराव भोसले पाटील यांनी सांगितले. स्पर्धेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखेबरोबरच इतरही जिल्हा परिषद शाळा, मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा प्रमुख संजय गळीतकर व प्रा.डाॅ. विश्वनाथ आवड यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...