आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाक्षरी माेहिम:विकास मंचच्या उपोषणास वाढता पाठिंबा ; समाजातील सर्व स्तरांतून मागणी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

होटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी सुरू झालेेल्या चक्री उपाेषणाला सगळ्याच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर, नितीन टेंभुर्णीकर, राशीद शेख, काँग्रेसचे उपाध्यक्ष राजन कामत, आम आदमी पक्षाचे अॅड. सागर पाटील, भाजपा अल्पसंख्याक सेलचे डॉ. अब्दुलरब बोडेवाले, एमआयएमचे एजाज बागवान, यांच्यासह इंडियन दलित सेना, वंचित बहुजन आघाडी, जी.एम. ग्रुप, उध्दव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आदींनी भेटी दिल्या. पाठिंबाही जाहीर केला.

स्वाक्षरी माेहिमेतील मान्यवर
या आंदाेलनस्थळीच स्वाक्षरी माेहीमही सुरू करण्यात आली. त्यासाठी दत्तात्रय मुळे, संतोष कलकुटगी, जयसिंग साळुंखे, भगवान जाधव, शशिकांत बेदरकर, ना. वा. दुमालदार, गजानन सुमंत, अनिल देशमुख, प्रा. धनंजय शहा आदींनी भेट दिली.

बातम्या आणखी आहेत...