आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नित्यम् गोंधळम्:उर्दू एमएच्या विद्यार्थ्यांना उत्तराच्या खुणांसह हस्तलिखित प्रश्नपत्रिका

सोलापूर / अजित बिराजदार12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षेतील सावळा गोंधळ सुरूच आहे. या गोंधळाच्या मालिकेत एम.ए. उर्दूची भर पडली. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना चक्क हस्तलिखित आणि उत्तराच्या खुणा असलेली प्रश्नपत्रिका देण्यात आली. एम.ए. उर्दू विषय विद्यापीठ अधिविभागातील भाषा संकुलात आहे. यासाठी वीस विद्यार्थी आहेत.विद्यापीठात प्रशिक्षित मनुष्यबळ असताना हस्तलिखित प्रश्नपत्रिका काढण्याचा प्रकार विद्यापीठाने रूढ करून टाकला. एम.एस्सी. गणिताच्या प्रश्नपत्रिके प्रमाणे एम. ए. उर्दूच्या प्रश्नपत्रिकाही हस्तलिखितच आहेत. प्रश्नपत्रिकेवरच बरेाबर उत्तरासाठीच्या खुणा असल्याचा हा प्रकार पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या दुसऱ्या वर्षातील परीक्षेत समोर आला आहे.

गोंधळाची मालिका सुरूच
१४ जुलैपासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षेत नित्यनेमाने गोंधळ सुरूच आहे. एनटीसीच्या मायक्रोव्हेव विषयाच्या आदर्श उत्तरपत्रिकेसत २४ उत्तरे चुकीची , एमएसएसी गणितच्या प्रश्नपत्रिकेत गोंधळ, विद्यापीठातच एमए, एमएससी, एमबीएच्या परीक्षेवेळी विद्यार्थी जास्त आणि आसन व्यवस्था कमीचा गोंधळ आदी प्रकारे नेहमीच समोर येत आहे.

कडक कारवाई करणार
प्रश्नपत्रिकेवर आधीच खुणा असलेला पेपर विद्यार्थ्यांना सोडविण्यात देण्यात आलेल्या या प्रकाराची गंभीर दखल विद्यापीठाने घेतली आहे. हा अत्यंत चुकीचा प्रकार आहे. कडक कारवाई करत आहोत.’’
डॉ. मृणालिनी फडणवीस, कुलगुरू , सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठाने चुकांची खबरदारी घ्यावी
विद्यापीठाच्या परीक्षा गोंधळाची मालिकाच सुरू आहे. यात दखल घेत सातत्याने होत असलेल्या या कारभाराबाबत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाईसाठी पाठपुरावा करीत आहे. विद्यापीठानेही वारंवार होणाऱ्या चुका टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी.’’
प्रणिती शिंदे, आमदार.

बातम्या आणखी आहेत...