आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिर्याद:पैशासाठी छळ, परस्पर दुसरे लग्न केलेे पतीसह 10 जणांवर गुन्हा

सोलापूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करून परस्पर दुसरे लग्न केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. लक्ष्मी पाटील (वय ३८, रा. नवनाथ नगर, अक्कलकाेट राेड एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली असून गिरीश पाटील, शिवकांता पाटील, राजशेखर पाटील, रायप्पा पाटील, जगदीश पाटील, सतीश पाटील, महेश्वरी पाटील, चन्नाम्मा पाटील, राजेश्वरी पाटील, अश्विनी पाटील यांच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या मंडळींनी माहेरहून प्रॉपर्टीचा हिस्सा आणण्याचा तगादा लावला हाेता. नंतर माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये ही दिले. २०१९ मध्ये विवाहितेला माहेरी सोडले, नांदायला घेऊन गेलेच नाही. पतीने परस्पर दुसरे लग्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...