आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अरे व्वा...ज्या शाळेत शिकले....त्याच शाळेचे झाले मुख्याध्यापक

माढा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संदीप शिंदे

व्यक्ति कितीही मोठा अथवा छोटा असो बालपण अन् शाळेतल्या  आठवणी  सगळ्यांना आपसुकच  आठवतात.ज्या शाळेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेचे मुख्याध्यापक झाल्याची आगळी वेगळी कहाणी निश्चितच  भुषणवाह अशीच राहते. अशीच कहाणी माढ्यातील नागेश खेडकर यांची आहे.

नागेश नरसिंह खेडकर यांनी  शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत शिक्षणाचे धडे गिरवले त्याच शाळेच्या मुख्याध्यापक पदाचे कर्तव्य ते आज  बजावत आहेत. १९८३ ते १९८९  साली नागेश  खेडकर यांनी ५ वी ते १० वी पर्यतचे शिक्षण शाळेत शिक्षण घेतले होते.१९९३ साली याच शाळेत सह शिक्षक म्हणुन रुजु झाले.२७ वर्षापासुन ते या शाळेत विद्यार्थ्याना  ज्ञानार्जन करीत आले असुन इंग्रजी,गणित विषयाचे अध्यापन करण्याबरोबरच त्यांनी स्काॅलरशिप,प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करुन घेत आतापर्यंत ३००  हुन अधिक  विद्यार्थ्यी गुणवत्ता यादीत आलेत.आई सुदामती वडिल नरसिंह यांनी काबाड कष्ट करीत नागेश यांचे शिक्षण पुर्ण केले.

 M. A. B. E.d  शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेऊन त्यांनी   First class मिळवले.नागेश यांच्या पत्नी मीनाक्षी या देखील याच शाळेत सह शिक्षिका म्हणुन कार्यरत असुन त्या नागेश यांच्या कार्याला पाठबळ देत आल्या आहेत. खेडकर यांनी दिलेल्या स्पर्धा परीक्षेतुन उपशिक्षणाधिकारी व मंत्रालयात मत्स्य  व्यवसाय विभागात अधिकारी म्हणुन पात्र ठरले होते.पंरतु त्यांनी जिल्हा परिषद प्रशालेचा शिक्षकाची नोकरी स्वीकारली.

ज्या शाळेत खडतर परिस्थितीचा सामना करित  शिक्षण पुर्ण केले.त्याच शाळेचे मुख्याध्यापक पद मिळाल्याने खेडकर यांच्या सह कुटूंबिय मित्रांचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेचे मुख्याध्यापक पदी माझि निवड झाली.हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस ठरला आहे.निश्चित पणे शालेय अभ्यास क्रमा बरोबरच  वेगवेगळ्या स्पर्धा उपक्रम राबवत   शाळेची यशस्वी घोडदौड अशीच पुढे सुरु राहील-नागेश खेडकर,मुख्याध्यापक जि.प.प्रशाला माढा

बातम्या आणखी आहेत...