आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:चारित्र्याचा संशयावरून पत्नीवर केला चाकूने वार

पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्याचा संशय घेवुन शिवीगाळी करत पतीने पत्नीच्या हातावर पायावर चाकुने वार केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे आठच्या सुमारास पंढरपुरात घडली.रेश्मा संतोष पवार (वय ३५, रा. कुंभार गल्ली, पंढरपूर) यांनी फिर्याद दिली आहे. रेश्मा यांचे २००० साली लग्न झाले. त्या सोमवारी सकाळी आठला त्यांची बहिण लक्ष्मी शंकर बंदपट्टे यांच्याशी फोनवर बोलत होत्या. त्यावेळी पती संतोष यांनी रेश्माच्या हातातील फोन हिसकावून लक्ष्मी यांना शिवीगाळ केली.

तुझ्या बहिणीनीने माझे नाव सर्वत्र खराब केले आहे. तिचे वागणे नीट नाही, पत्नीला सांगितले. फोन ठेवल्यानंतर रेश्मा घरातील काम करत होत्या. दरम्यान संतोष यांने घरातील चाकुने रेश्माच्या डाव्या हातापायावर वार केले.

उपचाराकरिता रेश्मा याना खाजगी रुग्णालयात येथे दाखल केले. पती संतोष तुकाराम पवार रा. कुंभार गल्ली पंढरपुर याने माझेवर चारित्र्याचा संशय घेवुन शिवीगाळी, दमदाटी चाकुने मारहाण केल्याची तक्रार रेश्मा यांनी शहर पाेलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार संतोष याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...