आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष मोहीम:नवरात्रनिमित्त महिलांची आरोग्य तपासणी

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या आरोग्य विभागाने नवरात्रोत्सवानिमित्त १८ वर्षांवरील युवती, महिलांची आरोग्य तपासणीसाठी नऊ दिवस विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याची सुरुवात सोमवारी करण्यात आली. पहिल्या दिवशी महापालिकेच्या काही दवाखान्यांत महिलांची उपस्थिती नगण्य होती.

दिवसभरात ६८१ महिलांची तपासणी करण्यात आली.राज्य सरकारच्या सूचनेनुसार शहरातील १५ दवाखाने आणि ८ प्रसूतिगृहात तपासणीची सोय होती. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये त्याच्या स्तरावर आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

तपासणी अशी : दाराशा येथे २१, साबळे ९, जिजामाता ५०, जोडभावी २८, बाळे १२, नई जिंदगी ३, मुद्रा सिटी ३३, डफरीन ४०, भावनाऋषी ६ तर रामवाडी येथे १० जणांची तपासणी केली आहे. रक्ताक्षय असलेल्या १० महिला, तीव्र रक्ताक्षय ५, मधुमेहाच्या ५९ महिलांचा समावेश आहे.

५ ऑक्टोबरपर्यंत शिबिर
शिबिर ५ ऑक्टोबरपर्यंत असेल. याचा लाभ घ्यावा. जेणेकरून माता सुरक्षित राहिल्या तरच कुटुंब सुरक्षित राहण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले.