आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकाल:आरोग्य विद्यापीठ शिक्षकेतर‎‎ भरती परीक्षेचा निकाल जाहीर‎‎

सोलापूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान‎ विद्यापीठाच्या आस्थापनेवर‎ रिक्त‎ शिक्षकेतर पदांकरिता नुकत्याच‎ घेण्यात आलेल्या‎ लेखी परीक्षेचा‎ निकाल जाहीर करण्यात आला‎ आहे.‎ राज्यातील एकूण २८‎ परीक्षा केंद्रांवर एकूण १४ हजार‎ ८०‎ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली‎ होती. यात विविध‎ पदांचा समावेश‎ हाेता.‎‎ हा निकाल विद्यापीठ अधिकृत‎ संकेतस्थळ‎ www.muhs.ac.in‎ वर सर्वांना पाहता येणार आहे.

या‎‎ परीक्षेस प्रविष्ट उमेदवारांना गुण‎ पडताळणी‎ करण्यासाठी सात‎ दिवसांचा कालावधी देण्यात‎‎ आलेला आहे.‎ तद्नंतर पदनिहाय व संवर्गनिहाय‎‎ गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.‎‎ विद्यार्थ्यांनी निकालासंदर्भात खोटा संदेश व‎ अफवांवर‎ विश्वास ठेऊ नये, असे‎ विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक‎ डाॅ.‎ संदीप कडू यांनी सूचित केले आहे.‎ रिक्त‎ शिक्षकेतर पदांकरिता दि.‎ १४ ते १८ ऑक्टोबर २०२२‎‎ कालावधीत लेखी परीक्षा घेण्यात‎ आली होती. त्या‎ परीक्षांचा निकाल आता जाहीर करण्यात आला आहे.‎ संपूर्ण निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध‎ करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...