आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णयाकडे लक्ष:जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचना हरकतींवर बुधवारी सुनावणी

सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील सुचना, हरकतींवर बुधवारी (दि. 15) पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातून 95 जणांनी प्रारूप प्रभाग रचनांवर हरकती घेतल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सोलापूर जिल्हा परिषदेचे 77 गट, पंचायत समितीच्या 154 गणांची प्रारुप प्रभाग रचना नुकतीच जाहिर झाली होती. आगामी विधानसभेची पायाभरणी झेडपी व पंचायत समिती निवडणुकांच्या माध्यमातून होत असल्याने, आजी-माजी आमदार, त्यांच्या निकटवर्तीयांचे या निवडणुकांकडे विशेष लक्ष असते.

प्रभाग रचना करताना गावांची निवड एकसलग ऐवजी खंडीत पद्धतीने झाली, एकाच गणांतील गाव दुसऱ्या गटाला जोडण्यात आले. यासह प्रभाग रचना चुकीची असून त्यामध्ये बदल करा, अशा हरकतीचा समावेश होता. पंढरपुर आणि अक्कलकोट मधून सर्वाधिक हरकती दाखल झाल्या आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातून ही एकही हरकत दाखल झालेली नाही.

नव्याने रचना करण्याची मागणी

झेडपी, पंचायत समितीची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर टेंभुर्णी नगरपंचायतीची घोषणा झाली आहे. त्यामुळे तेथील गट, गण रचना रद्द करून नव्याने रचना करण्याची मागणी काहींनी हरकतींमध्ये घेतली होती. त्यासंदर्भात बुधवारी निर्णय होईल.

सुनावणी एक दिवस पुढे

मंगळवारी (दि. 14) त्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार होती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आल्यामुळे सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आली होती. गुरुवारी (दि. 15) दुपारी 3 वाजता सोलापूर जिल्ह्यातील हरकतींची सुनावणी विभागीय आयुक्त घेणार आहेत. संबधित हरकतदार, त्यावेळी उपस्थित राहून त्यांचे म्हणणे मांडतील.

बातम्या आणखी आहेत...