आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टीचा फटका:उत्तर तालुक्यात पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान

उत्तर सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्याला परत एकदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. मंगळवारी रात्री तालुक्यातील बहुतांश गावामध्ये ६० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. वांगीत तब्बल ९० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद स्थानिक पर्जन्यमापकात झाली आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार पाच पैकी मार्डी, वडाळा मंडळात अनुक्रमे ६४.७ व ६७ मिलिमीटर पाऊस पडला. तिऱ्हे मंडळात २० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसाचा फटका खरीप पिकांना बसला आहे. सखल भागातील खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत. यामध्ये सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी रात्री सातच्या सुमारास तालुक्यातील पडसाळी वडाळा भागात पाऊस सुरुवात झाली. त्यानंतर तालुक्यातील इतरही भागात पावसाने हजेरी लावली. मध्यरात्रीही काही प्रमाणात पाऊस पडला. पावसाच्या पाण्याने नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...