आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन साहित्य संमेलन:सोलापुरात 29 ते 31 जुलै दरम्यान आयोजन; कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

25 वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन 29 ते 31 जुलै दरम्यान हुतात्मा स्मृती मंदीरात होत असून, या तीन दिवसात ग्रंथदिंडी, परिचर्चा, परिसंवाद, कवी सम्मेलन, जैन साहित्य सेवा पुरस्कार आदी कार्यक्रम होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येईल.

यांच्या उपस्थितीत बैठक

साहू जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सम्मेलनाच्या तयारीसाठी रविवारी महावीर सांस्कृतिक भवन येथे संम्मेलनाचे स्वागताध्यक्ष मिलिंद फडे, सम्मेलध्यक्ष रावसाहेब पाटील, केतन शहा, सुरेखा शहा यांच्या उपस्थित बैठक झाली.

सोलापुरात होणार संमेलन

25 वे अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलन स्वागत समिती आणि पंचरंग प्रबोधिनी आयोजित महाराष्ट्र जैन साहित्य परिषदेच्या वतीने सोलापुरात संमेलन होत आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता श्राविका संस्था येथे ग्रंथ पूजन करुन ग्रंथ दिंडी मिरवणूक सुरुवात होणार आहे. चार हुतात्मा पुतळा येथे अभिवादन करुन स्मृती मंदीर येथे दिंडी जाईल. तेथे ध्वजारोहण होईल. दिवाणबहाद्दूर अणासाहेब लठ्ठे ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. आचार्य विद्यानंद जैन इतिहास स्थापत्य व कला प्रदर्शन असणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होईल. या सोहळ्यास राज्यपाल यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

असे आहे नियोजन

30 जुलै रोजी युवक साहित्यअभिरुची सद्यस्थिती व भवितव्य यावर परिचर्चा होईल. मराठी जयंतीचे अभिलेख, मराठी जैन साहित्य व जैन स्त्री, प्राचीन महाराष्ट्राला जेव्हा जाग येते या विषयावर परिसंवाद होणार आहेत. 31 जुलै रोजी अहिंसा अनेकान्त व अपरिगृह, महात्मा गांधीजीचे जीवन व विचार..विश्वशांतीचा संदेश व प्रसार माध्यमे बदलते संदर्भ आणि संधी या विषयावर परिसंवाद होईल. दुपारी 1 वाजता जैन साहित्य सेवा पुरस्कार वितरण व समारोप कार्यक्रम होईल. यावेळी तुषार गांधी, माजी खासदार राजू शेट्टी, कुलगुरु मृणालिनी फडणवीस आदी उपस्थित राहणार आहेत. जीवन गौरव पुरस्कार इंचलकरंजीचे कल्लप्पण्णा आवाडे, बेळगावचे पुष्पदंत दोड्डण्णवार, एस. पी. जैन मुंबई, अरविंद दोशी सोलापूर, रावसाहेब पाटील-बोरगावकर, जिंतूरचे मुकूंद सावजी यांना देण्यात येणार आहे. जैन साहित्य सेवा सन्मान सुरेखा शहा, लीला शहा, अ‍ॅड. प्रदिप शहा, श्रीधर हेरवाडे, प्रा. राजकुमार शहा यांना देण्यात येणार आहे.

यांची होती उपस्थिती

संमेलन तयारीसाठी रविवारी बैठक झाली. यावेळी रावसाहेब पाटील, मिहीर गांधी, मिलिंद फडे, सुनिल गांधी, संजीव पाटील, नरेश बदनोरे, सुरेखा शहा, केतन शहा, अनिल जमगे, नंदकुमार कंगळे, निशा गांधी, सुवर्णा कटारे, शाम पाटील, अभिनंदन विभूते, पार्श्वनाथ खोबरे, रविंद्र कटके आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...